कुंभोज (विनोद शिंगे )
सध्या हातकणंगले विधानसभा गुप्त निवडणूक प्रचार यंत्रणेला चांगल्याच पद्धतीने जोर आला असून आचारसंहिता जाहीर होताच सर्व खुल्या प्रचार यंत्रणा थंडावल्या गेल्या असून आता गुप्त बैठकांना सर्वच राजकीय गटातून जोर आला आहे. परिणामी चौकाचौकात सध्या विधानसभा निवडणुकीवर व महाराष्ट्राच्या स्थापन होणाऱ्या नुतन सरकारवर चर्चा करत असताना सर्वसामान्य नागरिक दिसत असून कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण असेल यावर मात्र चर्चा चांगल्याच रंगत आहेत.
परिणामी अशातच काही उत्साही कार्यकर्त्यांना इच्छुक उमेदवारांचे अचानक परिसरातील अभ्यासासाठी फोन आल्याने सदर कार्यकर्ते सध्या हवेतच असून साहेब परिसरात आपलच वार आहे हे सांगण्यात ते व्यस्त आहेत परिणामी घटनेने सर्व सामान्य नागरिकाला मताचा एकच अधिकार दिला असून, त्या मताचा सध्या मतदार योग्य वापर करत असल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीपासून सर्वत्र पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या व सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा अन्न वस्त्र निवारा व शेतीसाठी आवश्यक असणारे उपाययोजना यातच अडकले असून सर्वसामान्य नागरिकाला राज्य लेव्हलला स्थापन होणाऱ्या कंपन्या राज्यात होणाऱ्या घडामोडी, अर्थव्यवस्थेत चाललेली चढउतार याच्याशी काही देणे देणे नसून, शेतीतील मिळणाऱ्या सामान्य उत्पादनाला जास्त हमीभाव मिळावा ,शेतकऱ्याला मोफत वीज मिळावी, मुलीना मोफत शिक्षण मिळावे व आवश्यक असणाऱ्या खर्च्याच्या मोठ्या प्रमाणात शासनाने फंड उपलब्ध करून ग्रामीण भागातील विकास यंत्रणा राबवावी अशा गोष्टी मनात घर करून आहेत.
परिणामी सध्या राखीव असणाऱ्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी गुप्त बैठकींना प्राधान्य दिले असून गेल्या महिन्याभरातच अनेक इच्छुक व विद्यमान उमेदवारांनी आपले संपर्क दौरे विकास कामांचे उद्घाटने व वेगवेगळे कार्यक्रम राबवून जनतेच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील अनेक महिलांना लागू केलेल्या वेगवेगळ्या योजना, विद्यार्थ्यांना लागू केलेली मोफत शिक्षण योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत लाईट योजना, याचा नेमका फायदा कोणाला होणार यावर सध्या चर्चा रंगतदार बनत असून इथून पुढे सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींना जे नेते व जो पक्ष महत्त्वाच्या ठिकाणी ठेवून विकास कामे करेल तोच पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणात सक्रिय होईल असा विश्वास सर्वसामान्य मतदार बंधू-भगिनींच्यातून व्यक्त होत आहे.
परिणामी आचारसंहिता लागू होताच चौकाचौकातील मोठे मोठे डिजिटल बोर्ड गायब झाले असून अनेक चौकातील मानाच्या पुतळ्नानी व नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. परिणामी आता गुप्त बैठका व आपला नेता कसा योग्य आहे हे सांगण्यात ग्रामीण भागातील गटनेते सक्रिय झाले असून आता एक महिना त्यांच्या पायाला रिंगण बांधले जाणार आहे. परिणामी सदर निवडणुका ऐन दिवाळीतच आल्याने खऱ्या अर्थाने मतदाराची दिवाळी साजरी होणार असेमत ही सर्वसामान्य ग्रामीण भागातील व्यक्त होत आहे.