प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भुदरगड तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्प, आप्पाचीवाडी प्रकल्पाचे पाणीपूजन

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्प, आप्पाचीवाडी हा पुर्णत्वास गेला असून या प्रकल्पाचे पाणी पुजन प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शेतकरी बांधव व प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

प्रकाश आबिटकर यांची पाणीदार आमदार अशी राधानगरी मतदारसंघात ओळख झाली असली तरी, डोंगर कपारीत वसलेला हा मतदारसंघ मला पाणीदार करायचा आहे. येथील डोंगर हिरवा शालू पांघरलेला पाहायचा आहे. हा प्रकल्प या परिसराला वरदान ठरला असून मतदारसंघात पाण्याच्या अनेक योजना आणल्याने आयुष्याचे सार्थक झाल्याचे वाटते. गोरगरीब लोकांसाठी काय करता येते ते आगामी काळात निश्चित करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कल्याणराव निकम, पंचायत समितच्या माजी सभापती आक्काताई नलवडे, अशोकराव भांदीगरे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील, बसरेवाडी माजी सरपंच संदीप पाटील, सरपंच शोभा सारंग, सुषमा बाऊस्कर, अरुण देवाळे, दिनकर गुरव, संदीप देसाई, संजय कांबळे, एस. के. कांबळे, श्रीपती डौर, बाबूराव सारंग, संदीप पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.