कोल्हापूर : आर्थिक समृद्धीतून समाज सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या जागतिक जैन व्यापार संघटने (JITO) च्या कोल्हापूर आवृत्तीच्या नविन कार्यकारणीच्या सत्कार सोहळ्याला सतेज पाटील यांनी उपस्थित राहून सदस्यांचे अभिनंदन केले. यावेळी सतेज पाटील म्हणाले,या संस्थेने आर्थिक क्षेत्राबरोबरच, शैक्षणिक आणि सामजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. संस्थेकडून राबवलेल्या अनेक उपक्रमातून समाजातील अनेक घटकांना रोजगार, शिक्षण आणि व्यावसायिक मार्गदर्शन मिळत आहे. यावेळी त्यांनी अनेक मान्यवरांशी संवाद साधता आला.
या सत्कार सोहळ्याला विजयजी भंडारी, राजेंद्रजी जैन, संजयजी घोडावत, नेमचंदजी संघवी, गिरीषजी शहा, अनिलजी पाटील, रवी संघवी, राजीवजी पारिख, सिताराम कोरडे, जयकुमार पारिख, हर्षद दलाल, माया राठोड, प्रतिक ओसवाल यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.