धनंजय महाडिक यांचा हस्ते गडमुडशिंगी येथील शाळा इमारतीचे भूमीपूजन व कोनशीला कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर: गडमुडशिंगी येथील कुमार व कन्या विद्यामंदिर नवीन शाळा इमारतीचे भूमीपूजन व कोनशीला कार्यक्रम खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा विभागाकडून महापरेशन संस्थेच्या माध्यमातून गडमुडशिंगीच्या जिल्हा परिषदसाठी महापरेशनच्या सीएसआर फंडातून 6, 85 , 85 , 720 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेसाठी एवढा मोठा निधी पहिल्यांदाच मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर करण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा केला आहे. यामुळे ग्रामीण भागात एक अद्ययावत शिक्षण संकुल उभा राहत आहे. या शिक्षण संकुलाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

 

 

विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगल्या वातावरण लाभणे गरजेचे आहे. तसेच खेळासाठी सुसज्ज मैदान असावे, यासाठी गडमुडशिंगी येथे शाळेच्या नव्या इमारतीची उभारणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विकसित भारताच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून विविध ठिकाणी शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. याबद्दल महाडिक यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना माहिती दिली.

यावेळी अमल महाडिक, पंडित पाटील, मा. तानाजी पाटील, नेमगोंडा पाटील,अनिल पाटील, प्रदीप झांबरे, जितेंद्र यशवंत, अशोक दागट, आप्पासाहेब धनवडे, संपदा पाटील, संगीता गोसावी, समरजीत पाटील, अमित माळी, सर्जेराव धनवडे, इंदुबाई कोगे, द्रोपती सोनुले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.