कुंभोज : इचलकरंजी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय कोणत्याही सांडपाणी पाण्यावर प्रक्रिया करीत नसल्याने घातक बायोमेडिकल वेस्ट लाखो लिटर सांडपाणी ड्रेनेज भुयारी गटार मार्गे इचलकरंजी पंचगंगा नदीमध्ये विना प्रक्रिया विनापरवानगी सोडत असल्याने उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक यांच्यावर मनुष्यवधाचे व फौजदारी गुन्हे दाखल करून मक्तेदाराची बँक गॅरंटी जप्त करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी केली याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी क्षत्रिय अधिकारी अंकुश पाटील येऊन इंदिरा गांधी रुग्णाला नोटीस बजावली आहे.
इचलकरंजी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकूण 200 बेडचे रुग्णालय असून रुग्णालयामध्ये वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आणि पोस्टमार्टम चे सांडपाणी व बायो मेडिकल वेस्टचे सरळ इचलकरंजी पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्याने यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे यामध्ये डायरिया कावीळ हिवताप व फ्ल्यू सारखे आजार व कोरोना सारखे गंभीर आजार उद्भवत असून त्वचा विकार पोटाचे विकार वेगवेगळ्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत असल्याने इचलकरंजी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयावरती कठोर कायदेशीर कारवाई करून नवीन प्रकल्प स्थापन करणे बाबत आदेश व्हावेत व तो कार्यान्वित करण्यासाठी उपाय योजना करण्यात यावेत व इचलकरंजी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयावरती अधीक्षक यांच्यावरती फौजदारी मनुष्यवधाचे गुन्हा दाखल करून बँक गॅरंटी जप्त करण्यात यावी कारण इचलकरंजी मध्ये कावीळ सारख्या चाळीस लोकांचा जीव गेला होता लाखो लोक आजारी पडले होते.
याची दखल घेऊन इंदिरा गांधी रुग्णालयाला आज अंकुश पाटील क्षत्रिय अधिकारी प्रदूषण यंत्र मंडळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता यावेळी सीईटीपी प्लांट व ईटीपी प्लांट बसवण्याच्या सूचना केल्या व डॉक्टर नंदकुमार बनगे यांना नोटीस बजावून लवकरात लवकर हा प्लांट सुरू करण्याचे आदेश केले अन्यथा कारवाई करण्याचा इशारा प्रदूषण यंत्र मंडळाचे अधिकाऱ्यांनी दिला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी तक्रार केली होतीतातडीने ईटीपी प्लांट उभारण्यात यावा व उपाययोजना करण्यात यावेत आत्तासुद्धा वेगवेगळे लोकांना नागरिकांना आजार जडत आहेत यामध्ये त्वचा विकार पोट दुखी चे विकार उलटी जुलाब असे अनेक प्रकार होत असल्यामुळे इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये लवकरात लवकर या सुविधा सुरू होतील असा विश्वास डॉक्टर नंदकुमार बनगे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांना दिला आहे