कोल्हापूर : कागल तालुक्यातील अर्जुनी गावातील सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई, सुरेश देसाई, बाबासो देसाई आणि सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत समरजित घाटगे यांना साथ देण्याचा संकल्प केला.
यावेळी त्यांची बहुमूल्य साथ हीच आमची शक्ती असून भविष्यात आपल्या कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा विश्वास समरजित घाटगे यांनी दिला. परिवर्तनाच्या या लढाईत आपण सर्वजण मिळून सहभाग नोंदवू आणि विजयश्री खेचून आणू, असा निर्धार या निमित्ताने केला.