कोल्हापूर: कुरुंदवाड आगारातील अपुऱ्या बसेसमुळे शिरोळ तालुक्यातील प्रवाशांची,विशेषतः विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती.या समस्येवर लक्ष देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन विभाग असल्याने त्यांच्याकडे ज्यादा बसेससाठी पाठपुरावा केला होता,यामुळे कुरुंदवाड आगाराला १० नव्या बसेस मंजूर झाल्या, आठ बसेस आगारात दाखल झाल्या असून, उर्वरित दोन बसेस लवकरच दाखल होणार आहेत.या बसेसमुळे प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट थांबून त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे,प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता आगाराला सर्व आवश्यक सुविधा यापुढेही पुरवण्यात येईल,असे आश्वासन यावेळी केले. कुरुंदवाड आगार या ठिकाणी आठ नव्या बसेस दाखल झाले असून त्या बसेसचे पूजन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा विभागाचे नियंत्रक शिवराज चव्हाण,वाहतूक अधिकारी बोगरे साहेब,आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे,दादासो पाटील,बाळासो दिवटे,जवाहर पाटील, अक्षय आलासे,शरद आलासे,बाबासो भबिरे,दीपक गायकवाड,सुनील गायकवाड,किरणसिंह जोंग,महावीर पाटील,राजू घारे,सागर मगदूम, सावकार दत्तात्रय मगदूम, अमित सावगावे,भरत भबिरे,बंडू खराडे, शब्बीर भिलवडे,अर्षद बागवान, सुनील कुरुंदवाडे, रमेश भुजुगडे, तानाजी आलासे,चंद्रकांत जोंग,प्रा. सुनील चव्हाण,उमेश करनाळे,विकास कदम,गुरुदास खोचरे,रामचंद्र कुंभार, विजय अनुजे,संजय शिरटीकर,गोटू अनुजे,किशोर चव्हाण,औरवाड सरपंच शफी पटेल,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सौरभ जाधव,नृसिंहवाडी वाहतूक नियंत्रक संजय मावळे आणि कुरुंदवाड व नृसिंहवाडी आगाराचे सर्व कर्मचारी व अधिकारी देखील उपस्थित होते.कुरुंदवाड आगार हा तालुक्यातील महत्त्वाचा आगार असल्याने या नवीन बसेसच्या आगमनामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक होईल आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बस सुविधा अधिक सुधारली जाईल,असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.