कागल: आपण नेहमीच गोरगरीब जनता हे केंद्रबिंदू मानून कायमपणे काम करीत आलो आहे. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचा राज्यातील लाखो गोरगरिबांना याचा लाभ झाला आहे. आपल्या तालुक्यामध्ये २२ हजार लाभार्थी आहेत. आता नव्याने ८०० लाभार्थ्यांना मंजुरी पत्र दिली. गोरगरिबांना मिळणारी ही पेन्शन त्यांची आधार बनली आहे. असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बहुउद्देशीय हॉलमध्ये कागल तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेतील ८०० लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली. दरम्यान गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतील दहा लाभार्थ्यांनाही प्रति दोन लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.
‘जेव्हा नव्याने आमचे सरकारमध्ये सहभागी झालो, त्यावेळी विशेष सहाय्य खाते स्वतःहून मागून घेतले. आजवर आपण गरीबाचे कल्याण करण्याचे काम केले आहे. गोरगरिबांच्या आजही खूप समस्या आहेत. विधवा, परितक्त्या, वृद्धापकाळ, दिव्यांग असे अनेक घटक या योजनेपासून वंचित होते. त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. आज १५०० रुपये प्रति महिना पेन्शन मिळते. जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या पगार पत्रकावर सही करण्यापूर्वी या पेन्शनधारकांना पेन्शन मिळण्याची व्यवस्था केली आहे.
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, ‘संजय गांधी, श्रावणबाळ योजना मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामुळे राज्यभर पोहचली या योजनेतील बारकावे शोधून सामान्यातील सामान्य माणूस पात्र झाला.
स्वागत संजय गांधी निराधार समितीचे सदस्य शशिकांत खोत यांनी केले. नायब तहसीलदार अर्चना कुलकर्णी, मनोज फराकटे, विकास पाटील आदी उपस्थित होते.