सुळे-आकुर्डे पुलासाठी मंजुर कामाचा चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न

कोल्हापूर : ‘गावोगावी विकास वारी’ या चंद्रदीप नरकेंच्या सुरू असलेल्या कार्यक्रमांतर्गत आज सुळे-आकुर्डे पुलासाठी 7 कोटी 50 लाख रुपये मंजुर कामाचा  चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.

 

 

पावसाळ्यात या पुलावर पाणी आल्यामुळे येथील गावांना बेटाचे स्वरूप येते. आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटतो. सदर काळात आरोग्याच्या सोई-सुविधांचा मोठा प्रश्न निर्माण होतो. 15-20 दिवस पाणी राहिल्यामुळे दुधाची वाहतूक करता येत नाही. एकूणच पावसाळ्यामध्ये या पुलावर येणाऱ्या पाण्यामुळे, पंचक्रोशीतील गावांमध्ये आर्थिक, आरोग्याच्या आणि इतर विविध समस्या निर्माण होत असतात. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा चालू होता, त्याला अखेर यश आले आणि या पुलासाठी निधी मंजूर झाला. आज त्या कामाचे उद्घाटन व भूमिपूजन पार पडले.

यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे विविध पदाधिकारी, त्या-त्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार मित्र आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.