चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत कळे येथील विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर: ‘गावोगावी विकास वारी’ या माझ्या सुरू असलेल्या कार्यक्रमांतर्गत आज कळे येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यासाठी 7 कोटी 25 लाख रुपये मंजुर कामाचा चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.

 

 

कळे बाजारपेठेत आजूबाजूच्या चाळीसहून अधिक गावातून लोकांची ये-जा असते. गेली काही वर्षे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या सर्वांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. याचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवत होता. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू होता, त्याला यश आले आणि या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला. त्या कामाचे उद्घाटन भूमिपूजन पार पडले. कळे आणि परिसरातील लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले.

यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे विविध पदाधिकारी, त्या-त्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार मित्र आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.