संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “युवा संवाद” कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने “युवा संवाद” जाहीर व्याख्यान मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक युवा व्याख्याते, कवी, झी टॉकीज फेम किर्तनकार. ह.भ.प. अविनाश भारती, हे होते. यावेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी अविनाश भारती यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

 

 

अविनाश भारती यांनी जीवन कसे जगावे या विषयी अर्थ सांगून विविध उदाहरणे देऊन, जीवन जगताना संघर्ष आपल्याला आडवे येत असून त्या संघर्षाला हसतमुखाने संघर्ष करण्याची तयारी युवा पिढीने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. संघर्षाचे जिवंत उदाहरण मी स्वतः असून हॉटेलमध्ये वेटरचे काम केलेलं असून आज तोच संघर्ष माझ्या उपयोगी पडला असून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. अंतरी भावना प्रबोधनाची संत परंपरेचा प्रबोधन वारसा सक्षमपणे चालवत तरूण कीर्तनकाराने नवीन वाट अवलंबली, अध्यात्म आणि सद्यस्थितीचे दाखले देणारे त्याचे व्याख्यान विद्यार्थ्यांचे मनपरिवर्तन करयास उपयुक्त ठरणारे होते.

इन्स्टिट्यूटमध्ये डिग्री शिक्षण घेत असलेल्या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाची कु. स्मृती मोरे विद्यार्थिनीचा “धोंड्या” नावाच्या चित्रपटात प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्या चित्रपटाचे पोस्टर अनावरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. सुहास पाटील यांनी मानाले. “युवा संवाद” कार्यक्रम संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला आहे.