रायगड : मराठा साम्राज्याचा मानबिंदू आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या, दुर्गराज रायगडची पाहणी ही जागतिक वारसा समिती (युनेस्को) मराठा लष्करी भूप्रदेश या अंतर्गत करण्यात आली. रायगडसारख्या दुर्गम आणि ऐतिहासिक मराठा लष्करी वास्तुशास्त्रीय महत्त्व असलेल्या वास्तु प्रामुख्याने महा दरवाजा व तटबंदी, वाघ दरवाजा व तटबंदी, टकमक टोक बालेकिल्ला राजसदर बाजारपेठ,जगदीश्वर मंदीर परिसर,भवानी कड्या जवळील सैनिकी वास्तु गडावरिल तसेच ऐतिहासिक जलाशये यांची अभ्यासपुर्ण पहाणी व भारतीय पुरात्तव विभाग व रायगड विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आलेली कामे सविस्तररित्या पाहण्यात आली.
पाहणीच्या पुर्वसंध्येला जागतिक वारसा समितीच्या तज्ञ समितीने रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यकारभार, महाराजांचा राज्याभिषेक, स्वराज्याच्या राजधानीचे त्याकाळातील महत्व तसेच सध्या रायगड विकास प्राधिकरणामार्फत चालू असलेली कामे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रत्यक्ष पहाणीनंतर भारतीय पुरात्तव सर्वेक्षण विभागाचे अधिकारी चौहान, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, आयकोमॉसच्या आर्कि. शिखा जैन, भारतीय पुरात्तव सर्वेक्षण विभागाचे मुंबई पुरात्तव अधिक्षक शुभ मुजुमदार, राज्य पुरात्तव विभागाचे संचालक . उगले व रायगड विकास प्राधिकरणाचे तज्ञ . ए. के. सिन्हा व प्राधिकरणाचे सर्व अधिकारी यांच्या समवेत वारसा समिती तज्ञ यांनी किल्ल्याच्या जतन व संवर्धन या बाबत सखोल चर्चा करण्यात आली.लवकरच ही जागतिक वारसा तज्ञ समिती त्यांचा पाहणी अहवाल युनेस्कोस सादर करणार आहे.