शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त राहुल पाटील यांची साबळेवाडी येथील मंडळास भेट

कोल्हापूर-
शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त राहुल पाटील यांनी शिवशक्ती ग्रुप, साबळेवाडी येथे मंडळास भेट देऊन देवीची पूजा केली.  करवीर हे महाराष्ट्रातील आद्य शक्तीपीठ असून, देवीची कृपादृष्टी इथल्या तमाम जनतेवर कायमच राहू देत, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. तसेच नवरात्री निमित्त उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.