90 व्या जयंतीनिमित्त सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृतीस हसन मुश्रीफांनी अभिवादन केले

कोल्हापूर:आज कागल गैबी चौक येथे 90 व्या जयंतीनिमित्त लोकनेते कै. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पवित्र स्मृतीस पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विनम्र अभिवादन केले.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, पत्रकार अतुल जोशी, ईगल प्रभावळकर, रणजीत बन्ने, सर्जेराव पाटील, इरफान मुजावर, महेश घाटगे, नारायण पाटील, सुरेश बोभाटे, संजय घडमोडे, अर्जुन नाईक, सचिन नलवडे, महेश गवळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.