गोरगरिबांच्या सेवेत आत्मिक समाधान,५०० वयोवृद्धांना श्रवणयंत्रे वाटप : हसन मुश्रीफ

कागल : हसन मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रुग्णवाहिका शववाहिका तसेच ५०० वयोवृद्धांना श्रवणयंत्र वाटप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होते.

 

मुश्रीफ म्हणाले,’राष्ट्रीयकृत बँकांना आपल्या नफ्यातून सामाजिक उपक्रमाकरिता काही रक्कम खर्च करण्याचा अधिकार आहे. या उपक्रमातूनच आज आय सी आय सी बँकेच्या माध्यमातून रुग्णवाहिका मिळाली आहे. कागल व गडहिंग्लज नगरपालिकेला या रुग्णवाहिकेचा उपयोग होईल. यापूर्वी राठोड कंपनी, कौस्तुभ बुटाला यांच्या कंपनीच्या माध्यमातूनही रुग्णांना मदत झाली आहे. त्याबद्दल कौतुक.’

गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले, ”मंत्री मुश्रीफ यांच्यासारखे गोरगरिबांचा विचार करणारे नेतृत्व आपल्याला लाभल्यामुळे आपण भाग्यवान आहोत.”

यावेळी आयसीआयसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी विकास देशमुख, हेमंत शिंदे, लक्ष्मीकांत स्वामी, अर्जुन काळे यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत संजय चितारी यांनी केले. प्रस्ताविक प्रवीण काळबर यांनी केले. यावेळी कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, नवल बोते, चंद्रकांत गवळी, नेताजी मोरे, विजयसिंह पाटील, विवेक लोटे, नितीन दिंडे, ज्योती मुसळे आदी उपस्थित होते. आभार जयदीप पवार यांनी मानले.