मुखमंत्र्यांच्या हस्ते वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन संपन्न

बुलढाणा : जिल्ह्यातील खामगांव येथील श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान, आळंदी अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाले. यासमयी जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी प्रथम श्री जगदंबा मातेचे भक्तिभावाने पूजन करून दर्शन घेतले. संस्थांनच्या वतीने स्मृतिचिन्ह देत मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित वारकरी संप्रदायातील प्रमुख प्रभूतींशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.

 

 

 

या भूमिपूजन समारंभाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तथा आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, संस्थानाचे अध्यक्ष पंकज केला, उपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टड, संस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते.