पुणे : खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईकडे निघालेले हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर पुण्यातील बावधन बुद्रुक या परिसरात कोसळले. यामध्ये दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला.

पुण्यातील बावधन बुद्रुक येथे ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेतील हेलिकॉप्टरचा स्फोट होऊन त्याचे तुकडे झाले. त्यामुळे वैमानिक आणि अभियंताचा मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याची माहिती समोर येत आहे. या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात धोके असल्यामुळे अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो.
