सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सांगली जिल्ह्यातील विटा येथील बसस्थानकाच्या पुनर्बाधणीचे भूमिपूजन करण्यात आले.सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बसस्थानकामध्ये १८ फलाटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये उपाहारगृह, दुकानगाळे, संरक्षित भिंत तसेच गेट त्याचबरोबर बसस्थानकाच्या अंतर्गत भागाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
यावेळी खासदार धैर्यशील माने ,पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार शहाजी बापू पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होते.