छत्रपती बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी घेतली आम. सतेज पाटील यांची भेट

कोल्हापूर: कसबा बावडा येथील छत्रपती बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी कोल्हापूर शहरस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले. त्यांचे सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

आज या खेळाडूंनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. त्यांचे अभिनंदन करून स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशिक्षक सम्राट फराकटे, महादेव कदम उपस्थित होते.