डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त सार्वजनिक मंच चर्चासत्र व मोफत तपासणी शिबिर

कोल्हापूर: जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालया मध्ये कान-नाक-घसा डॉक्टर संघटना व राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक मंच चर्चासत्र व मोफत तपासणी शिबिरास आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला.

 

याप्रसंगी डॉ. राजेश ख्यालप्पा, राजश्री माने, बाळासाहेब पाटील, अजित लोकरे, एन.डी. गुरव, जयंत वाटवे, शिरीष कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, अंजना मोहिते, वासंती पाटील, संदेश बागडी, राधिका देसाई, संदीप पाटील, पराग वाटवे आदी उपस्थित होते.