कागल: कागल मतदारसंघात १२३ गावे आहेत. एकही गाव विकासकामापासून वंचित ठेवले नाही. १९ वर्षे मंत्री म्हणून काम करताना कामाची पद्धत बदलली नाही. एक इंच रस्ता डांबरीकरणापासून मागे ठेवला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन प्रवृत्तीचे उमेदवार असतील. आपण सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी आहे. तर दुसरीकडे शासकीय योजना घेणाऱ्या लाभार्थ्यां विरोधात तक्रार करून गोरगरीब कल्याण थांबण्याची धडपड करणारी वृती आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची तुलना करा.असे प्रतिपादन हसन मुश्रीफ यांनी मळगे येथे विविध विकास कामांच्या उदघाटन व लोकार्पण समारंभामध्ये केले.
मळगे बुद्रुक ता. कागल येथे साडे सात कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा उदघाटन व लोकार्पण समारंभ सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघाचे चेअरमन प्रवीण पाटील होते.
प्रवीण पाटील म्हणाले, विकासकामासाठी धमक असणा-या हसन मुश्रीफ यांच्या पाठिमागे हिमालयासारखे उभे रहा. त्यांचे काम समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशिवाय पर्याय नाही.
यावेळी बांधकाम कामगरांना संसार सेट वाटप करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक प्रताप पाटील यांनी केले. एकनाथ पाटील भगवान अस्वले सतिश पाटील सुदाम साबळे कृष्णात सोनाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आनंदराव अस्वले, श्रीकांत पाटील, रघुनाथ अस्वले, सरपंच नलिनी सोनाळे, बिद्री संचालक रंगराव पाटील, सुनिल सुर्यवंशी, रावसाहेब खिलारी, जीवन शिंदे, उत्तम पाटील, निवास परबकर उपस्थित होते.