कोल्हापूर : चंदगड महाविद्यालयामध्ये सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक ‘चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहून ‘सहकारातून समृद्धी आणि देश-विदेशातील रोजगारांच्या संधी’ या विषयावरती उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना चेतन नरके यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ते म्हणाले ,चंदगड हा माझा आवडता तालुका, या संपूर्ण चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे गोकुळ वर अनंत उपकार असून, चंदगड तालुक्यातील गुणवत्तापूर्ण दुधामुळेच गोकुळचा दर्जा वाढला आहे. या तालुक्यातील तरुण ही अतिशय कष्टाळू व प्रामाणिक आहेत. विद्यार्थ्यांसाठी आताच्या युगात उद्योगांमध्ये अनेक वेगवेगळ्या संधी उपलब्ध असून, कॉलेज जीवनामध्येच स्वतःला झोकून देत आपले करियर घडवणे गरजेचे आहे. स्वतःची जिद्द, चिकाटीच्या जोरावर आपल्याला हवे त्या क्षेत्रात झेप घेता येते. त्यासाठी कष्टाची व परिश्रमाची तयारी असावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालवता करिअर साठी झगडले पाहिजे.
यावेळी चेतन नरके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या जडणघडणातील, कॉलेज जीवनातील विविध किस्से सांगून विद्यार्थ्यांच्या करिअर व शिक्षण विषयक विविध प्रश्नांवरती दिलखुलास उत्तरे दिली. तसेच तुमच्या करियर संबंधित भविष्यातील कुठल्याही प्रश्नासाठी निसंकोच मनाने माझ्याकडे येऊ शकता असा विश्वास त्यांना दिला.
याप्रसंगी प्राचार्य मा. डॉ. एस डी गोरल, माजी राज्यमंत्री मा. भरमुअण्णा अण्णा पाटील, संस्थेचे सचिव मा. प्रा. आर. पी. पाटील, मा. तुकाराम बेनके, माजी प्राचार्य मा. डॉ. पी. आर. पाटील, मा. प्रा. टी. ए. कांबळे, मा. प्रा. एस. के. सावंत, मा. एस. व्ही. गुरबे, मा. प्रा. टी. एम. पाटील, मा. पांडुरंग काणेकर, मा. प्रा. ए. वाय. जाधव, मा. डॉ. एस. एन. पाटील, मा. डॉ. जी. वाय. कांबळे, मा. प्रा. एस. एम. पाटील, मा. डॉ. एस. डी. गावडे, मा. श्रीनिवास पाटील, मा. नंदकुमार चांदेकर, मा. डॉ. कमलाकर, मा. डॉ. एन. एस. मासाळ तसेच इतर मान्यवर, महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
.