कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन भाविकांसाठी उद्या शनिवारी बंद राहणार आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील गर्भागृहाची स्वच्छता करण्यात येणार आहे.
त्यासाठी उद्या सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत देवीच्या मुख्य मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही. त्यामुळे उद्या भाविकांना गाभाऱ्यात जाण्यास बंदी घातली आहे . त्या ऐवजी भाविकांना अंबाबाई देवीच्या उत्सव मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.