साहित्यात मराठी भाषेचे योगदान – डॉ सर्जेराव पदमाकर

कुंभोज  (विनोद शिंगे)

नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे, देशमुख इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये डॉ. सर्जेराव पदमाकर यांचे चौथे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते शिवाजी देशमुख व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य वाचावे, समजून घ्यावे. कविता, कथा, कादंबरी याचा अभ्यास करावा असे सांगून मराठी साहित्याचा दर्जा, इतिहास आणि महत्व विषद केले.त्यांनी काही उदाहरण आणि प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मार्मिक शब्दातून साहित्यात मराठी साहित्याचे योगदान सांगितले.

 

कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या सेक्रेटरी नमिताताई देशमुख, प्रा. सज्जन कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.आर.शिंदे यांनी केले तर स्वागत व प्रास्ताविक सहा. शिक्षक वाय एम बोराटे यांनी केले, आभार एस टी गावडे यांनी मानले.