शरद पवार यांनी धनंजय मुंडेना दिला ‘हा’ इशारा…

मुंबई : शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघाचे आमदार व अजित पवार गटाचे समर्थक कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.

 

शरद पवार म्हणाले, “काहीजण आमच्या नावाने निवडून आले आणि भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले या लोकांनी जनतेची फसवणूक केली आहे. ते आज सत्तेत असले तरी सत्ता कायमस्वरूपी नसते हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ही केवळ सुरुवात आहे,परळीत मी मोठी सभा घेईन, राज्यातील सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशा शब्दांत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला.

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात महायुतीच्या विरोधात वातावरण असल्यामुळे राज्यातील सत्ताबदल झालेला दिसेल. असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.