पश्चिम महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्ला ठरेल : अमित शहा

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्ला ठरेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारांच्या बैठिकेत ते बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस व राष्ट्रवादी शरद गटाच बालेकिल्ला मानला जातो. मात्र शरद पवार आणि कंपनीचा पराभव केला पाहिजे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नाराज कार्यकर्त्यांना हेरून त्यांना भाजपकडे वळवा विरोधी पक्षाचे बूथ कमकुवत झाल्यास भाजप अधिक मजबूत होणार आहे.

 

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपल्या महायुतीची सत्ता येणार आहे, तसेच भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी व्यक्त केला. दरम्यान इचलकरंजीचे ज्येष्ठ नेते आमदार प्रकाश आवाडे यांनी पुत्र राहुल आवाडे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला.

या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र जिंकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार धनंजय महाडिक आदी प्रमुख उपस्थित होते.