विद्यापीठातील मेसच्या जेवणात आढळल्या अळ्या

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहातील मेस च्या जेवणामध्ये अळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल जेवणात या अळ्या आढळून आल्या.

 

जेवणामध्ये अळ्या आढळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. याबाबत रेक्‍टरसह विद्यापीठ प्रशासनाला निवेदन पत्र देऊनही दखल घेतली जात नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

या प्रकरणामुळे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चार व पाच सप्टेंबर रोजी सलग दोन दिवस भात आणि वरणामध्ये अळ्या आढळल्या.  यावेळी विद्यार्थ्यांनी रेक्टर यांना पत्र दिले पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.