राज्य सरकारचा मोठा निर्णय ; सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ

मुंबई : राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आली.

 

त्या बैठकीमध्ये ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 75 हजार आहे त्यांना दहा लाखापर्यंत करण्यात आल आहे. तसेच ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी कर्मचारी यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात आली असून ,ही वाढ 20 टक्के इतकी आहे. अशी माहिती भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या दोन हजार पर्यंत आहे, त्या सरपंचाचे मानधन तीन हजार वरून सहा हजारावर करण्यात आल आहे. तर उपसरपंचाचे मानधन हे एक हजारावरून दोन हजार करण्यात आल आहे.

ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या 2 हजार ते 8 हजार आहे त्या सरपंचाची मानधन 4हजार वरून 8हजार तर उपसरपंचाचे महाधन पंधराशे वरून तीन हजार इतक करण्यात आल आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 8 हजार पेक्षा जास्त आहे . त्या सरपंचाचे मानधन 5 हजार वरून दहा हजार तर उपसरपंचाचे मानधन 2 हजार वरून 4 हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. या मानधन वाढीमुळे राज्य शासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यातील सरपंच आणि उपसरपंचामध्ये आनंदाचे वातावरण आहे.