महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष पदी राजेश पाटील यांची निवड

कुंभोज  (विनोद शिंगे)

ग्रामपंचायत शिरोलीच्या वतीने छ. शिवाजी महाराज सभागृह येथे महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल राजेश तात्यासाहेब पाटील यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे उपसरपंच कृष्णात करपे, सदस्य श्रीकांत कांबळे तसेच ग्रामपंचायत प्रतिनिधी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी, उपसरपंच कृष्णात करपे यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख करताना म्हणाले. सामाजिक शैक्षणिक तसेच क्रीडा श्रेत्रात उल्लेखनिय कार्य केले आहे. त्यांनी गोरगरीब जनतेच्या अडअडचणी सोडवण्यासाठी पतसंस्थे ची स्थापना केली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी दिली आहे. या पदाचे त्यांनी शेतकरी वर्गासाठी जास्तीत जास्त फायदा करावा असे सांगितले. यावेळी लोकनियुक्त सरपंच  पद्मजा करपे, ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या व प्रतिनिधी आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.

🤙 9921334545