कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील
इस्लाम धर्माचे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन समस्त मुस्लिम समाज भादोले व संजीवन ब्लड सेंटर, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जामा मस्जिद,मारुती चौक येथे करण्यात आले होते.रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. रक्तदान करून आपण प्रेमाचे नाते जोडून समाजाचे ऋण फेडू शकतो. काही नाती रक्ताची नसली तरी रक्ताने जोडता येतात. त्यामुळेच भादोले पंचक्रोशीतील युवकांनी रक्तदान करून सहकार्य करावे.असे आवाहन समस्त मुस्लिम समाज, भादोले यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष श्री गणि सनदे व श्री मन्सूर सनदे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संजीवन ब्लड सेंटरच्या डॉक्टर व सहयोगी कर्मचाऱ्यांना यावेळी मुस्लिम समाजातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.या शिबिरामध्ये एकूण 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देण्यात आले.सदर रक्तदान शिबिरास भादोले विकास संस्था सभापती दिलीप पाटील, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष कपिल पाटील, वारणा सहकारी बँक संचालक प्रकाश माने, माजी सरपंच संभाजीराव घोरपडे, भादोले विकास संचालक सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य तोफिक सनदे,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मोहसीन पोवाळे,विनायक जामदार,प्रदीप पाटील,संदीप पाटील, रफिक मुल्ला व शरीफ आत्तार (अंबप ) शशिकांत घोलप,रोहन घोलप,राकेश घोलप या मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.व समस्त मुस्लिम समाजास मुहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम राबवण्यासाठी जावेद मुल्लानी, जमीर सनदे,हुसेन कवठेकर, सज्जाद सनदे,रियाज सनदे, इम्रान कवठेकर,वाशिम मुजावर व संजीवन ब्लड सेंटरचे गौतम बागवडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल जमादार यांनी केले.सर्व रक्तदात्यांचे व उपस्थितांचे आभार समस्त मुस्लिम समाज,भादोले यांच्या वतीने शमीर सनदे यांनी मानले.शिबिरानंतर संजीवनी ब्लड सेंटर मार्फत मुस्लिम समाजास रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी, गणी कवठेकर, हाजी बंडुलाल सनदे,हाजी चांदसो जमादार,दादासो जमादार,हाजी दस्तगीर मुल्ला, हाजी दिलावर मुल्ला,हाजी.डॉ.
रियाज जमादार,मकबूल रोहिले,सलीम विजापुरे असिफ जमादार,शकील सनदे माणिक जमादार,महंमद सनदे, लियाकत मोमीन,मुनीर सनदे मोहसीन जमादार,साहिल कवठेकर,इर्शाद सनदे,इरफान सनदे,सोहेल सनदे,गुल्फाम कवठेकर,सरफराज सनदे, वसीम जमादार,सलीम सनदे, इनुस् मुल्ला,अमीन मुल्ला, बहादुर विजापूरे,शहाबाज विजापूरे,ताहीर मुजावर,जहीर मुजावर,अदनान विजापुरे, अमीर मुजावर,अजहर मुजावर,साहिल सनदे,अमन कवठेकर,सुहान सनदे,आयान सनदे,शफिक मुल्ला,रेहान मुल्ला,इजाज जमादार,आयन मुल्ला,सद्दाम सनदे इत्यादी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.