कुंभोज अर्बन सेवा सोसायटीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन -चेअरमन आप्पासाहेब पाटील

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
कुंभोज (ता. हातकणंगले) येथील कुंभोज अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या 63 वा वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ११५४ इतकी सभासद संख्या असणाऱ्या संस्थेचे, एकूण ठेवी 11 कोटी 61 लाख 90 हजार इतक्या झाले आहेत, संस्थेने सहकारात गुणवत्ता प्राप्त केल्यामुळे राज्यस्तरीय बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार मिळाला आहे, संस्थेने 63 वर्षाच्या कारकिर्दीत सभासदांचे हिताचे संरक्षण केले असून सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच संस्था आज प्रगतीपथावर पोहचली आहे.

आज संस्थेने स्वः मालिकेच्या इमारतीत प्रवेश केला असून त्या इमारतीचे उद्घाटन संस्थेचे स्फूर्तीस्थान बाबासाहेब पाटील ,संस्थेचे मार्गदर्शक आण्णा कळंत्रे ,चेअरमन आप्पासाहेब पाटील ,व्हाईस चेअरमन शितल कळंत्रे, संचालक सुरेश हिगंलजे रावसाहेब तोरस्कर, बाबासो कोले नितीन गारे ,मारुती अनुसे, अनुष पाटील ,शामराव परीट, नुरजहा मुजावर ,रूपाली कांबळे व सेक्रेटरी वडगाव बाजार समितीचे संचालक चाँद मुजावर, ऑडिटर कलगोड पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी झालेल्या वार्षिक सभेत संस्थेने मांडलेल्या जमाखर्च व अनेक विषयांना सभासदांनी हात उंचावून संमती दिली यावेळी संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब साहेब पाटील यांनी सर्व सभासदांचे व संचालकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व अहवाल वाचन सेक्रेटरी चांद मुजावर यांनी केले.