राज्यातील पहिला 100% शासकीय अनुदानातून उपसा जलसिंचन – आमदार प्रकाश आबिटकर

कोल्हापूर प्रतिनिधी:सौरभ पाटील

राधानगरी तालुक्यातील डोंगर माथ्यावर असणाऱ्या पिंपळवाडी गावास महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत विशेष प्रयत्नातून राज्यातील पहिली100% शासकीय अनुदानातून उभारण्यात येणाऱ्या उपसा सिंचन (लिफ्ट एरिगेशन) योजनेच्या कामाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी प्रकाश आबिटकर म्हणाले कि ,ज्या गावाला धड रस्ता देखील नव्हता अशा पिंपळवाडी गावासाठी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करू शकलो हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. या गावाशी माझे काय नाते आहे हे मला माहिती नाही पण गावातील युवकांनी जेव्हा श्रमदानातून रस्ता दुरस्ती केला त्यावेळी मी उपस्थित राहून श्रमदान केले. विधानसभेमध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याची बाब आम्ही विधानसभेत मांडली प्रसंगी सभागृह बंद पाडले. यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अस्तित्वात आली. याचे खऱ्याअर्थाने सुरवात याच गावापासून झाली.

या योजनेस खऱ्याअर्थाने मुर्तस्वरुप आले हे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळेच त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. बैठकीमध्ये मतदार संघातील धामणी, बारवे, दिंडेवाडी, मेघोली धरणाची पुर्न:बांधणी, विविध गावातील एम.आय.टॅंक, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, उपसासिंचन योजना अशा 530 कोटी रुपयांच्या प्रस्तावास तत्वत: मान्यता देवून निधीची तदतूर केली. यामुळे प्रलंबित सिंचन मार्गी लागण्यास मदत झाली आहे. पुढील काळात बारवे, पळशिवणे उपसा सिंचन योजना व बसुदेव भुजाई उपसा सिंचन योजना कामाच्या सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

या परिसरातील 7 वाड्या असणाऱ्या चक्रेश्वरवाडी, बारडवाडी, ढेरेवाडी, फणसवाडी यासह डोंगर माथ्यावरील कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहे.

यावेळी जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब आजगेकर, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अरुणराव जाधव, कल्याणराव निकम, अशोकराव फराकटे, सरपंच महादेव जाधव, विलास पाटील, सुभाष जाधव, विश्वनाथ पाटील, संग्रामसिंह पाटील, राजेंद्र वाडेकर, बारडवाडी सरपंच वसंत बारड, रविंद्र पाटील, अरविंद पाटील, विजय पाटील, डोंगरी क्षेत्र विकास समितीचे अध्यक्ष तानाजी पाटील, तुकाराम जाधव, विलास पाटील, मोहन वांगणेकर, प्रज्ञा जाधव, स्नेहा जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

🤙 8080365706