हुपरी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियान

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियान’ युवासेनेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यात येणार असून त्याच्या नियोजनाची बैठक युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हुपरी ता. हातकणंगले येथे संपन्न झाली.

 

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारने अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या आहेत. त्या योजनांची शिदोरी घेवून महिला भगिनी व त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधण्याच्या दृष्टीने हे अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच या अभियानात सरकारच्या योजनांचा लाभ मिळण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्नही युवासैनिकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे,निशिकांत पाटील,युवतीसेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे यांच्यासह युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख,समन्वयक,उपतालुकाप्रमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545