प्रवाशांनी खचाखच भरलेल्या केएमटीच्या इंजन मधून निघाला धूर ;

कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे

कोल्हापूर महानगरपालिकेची कोल्हापूर ते रूकडी मार्गे माणगाव ला जाणारी बस क्रमांक MH09-CV-0336 ही बस कोल्हापूरहून माणगावच्या दिशेला जात असताना, रूकडी गावांमध्ये आली. गावातील मेन रोड वर असणाऱ्या साईनाथ हॉस्पिटल जवळ या बच्चा इंजिन मधून धुर येऊ लागला. बघता बघता बसने आग पकडली. घटनेचे गांभीर्य ओळखून चालकाने बसमधील प्रवाशांना व स्वतः बस थांबून बस मधून बाहेर पडला.

 

यावेळी, बागडी गल्लीतील कै. संभाजीराव माने युवक संघटना गणेशोत्सव मंडळाचा महाप्रसाद चालू असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मंडळाच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. यावेळेला मंडळातील कार्यकर्ते व गावातील नागरिक धावून आले आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आग आटोक्यात आणून, संबंधित बसला धक्का मारून मराठी शाळेच्या पटांगणावर पार्क करण्यात आले,यावेळेला साई सर्विस मध्ये मेकॅनिक मग काम करणारे अनिल बागडी यांनी इंजन मधून निघणारे सर्व कनेक्शन कट केल्यामुळे मोठी हानी टळली आणि बसला लागलेली आग आटोक्यात आली.