मुंबई : मुंबईमध्ये आणखीन एक संतापजनक घटना समोर आली आहे. याआधी बदलापूर मधील शाळेत मुलीवर लैंगिक अत्याचारामुळे लोक संतप्त झाले होते. अशा घटना सतत घडत असल्यामुळे प्रशासनाचा लोकांवर धाक आहे कि नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गोरेगाव येथील प्रेमनगर मध्ये शेजाऱ्यांच्या घरी खेळायला गेलेल्या एका ४ वर्षीय मुलीवर अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी गोरेगाव पोलीसांनी २९ वर्षीय नराधमाला अटक केली आहे. बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या संरक्षण कायद्याअंतर्गत नराधमाला अटक करण्यात आली आहे.