बदलत्या वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ;

कोल्हापूर: जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून बदललेल्या वातावरणामुळे सर्दी तापाच्यारुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. हे बदललेले वातावरण आरोग्यासाठी अपायकारक असून, यामुळे दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढत आहे.

 

 

 

या वातावरणाचा परिणाम सर्वात जास्त लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. कोल्हापुरात गेल्या चार दिवसापासून पावसाची उघडीप आहे. बदललेल्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारामध्ये वाढ झाली आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी या आजाराच्या रुग्णात वाढ झाली आहे. लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी यांनी केल आहे.