पुणे: पुण्यातील पौड फाट्याजवळ भीषण अपघात झाला . या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. रात्री 11:00 च्या सुमारास मद्यधुंध अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरने पिकअप गाडीने चार-पाच वाहनांना जबरदस्त धडक दिली. या अपघातात महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे गंभीर झाले. तर त्यांची पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाला. श्रीकांत अमराळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात कारणीभूत ठरलेला आशिष पवार या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या ड्रायव्हरने पुण्यातील कोथरूड येथे करिष्मा चौकात अनेक गाड्यांना धडक दिली. तेथे काहीजण जखमी झाले. मात्र एवढं होऊनही तो थांबला नाही. दारूच्या नशेत ट्रक चालवत पुढे गेला. अनेक गाड्या धडक देत होता. त्यावेळी तेथे सिग्नल जवळ मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे व त्यांची पत्नी गीतांजली उभे होते. आरोपी ड्रायव्हरने दारूच्या नशेत पिकअप ट्रक थेट त्यांच्या अंगावर चढवला. यामध्ये गीतांजली अमराळे यांचा यांच्या अंगावरून टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे गंभीरित्या जखमी झाले. अपघाताचा हा थरार गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला त्यांनी तेथे धाव घेत आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.