कानपूर : कानपूर ते शिवराजपुर दरम्यान रेल्वे ट्रॅक वर सिलेंडर ठेवून त्याचा स्फोट घडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठं संकट टळलं. रेल्वे ट्रॅक वर एक एलपीजी गॅस सिलेंडर उलटा ठेवला होता. त्यानुसार सिलेंडर स्फोट करून रेल्वे उडवण्याचा प्रयत्न असल्याचा प्राथमिक अंदाज आहे याप्रकरणी दोन व्यक्तींची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास कालंदी एक्सप्रेस तिथून जात असतानाच स्फोट करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. एक्सप्रेसच्या लोको पायलटण सिलेंडर पाहून एमर्जेंसी ब्रेक लावला. मात्र ट्रेन वेगात असल्यामुळे ती सिलेंडरला धडकली. या धडकेमुळे सिलेंडर बाजूला जाऊन पडला. सिलेंडर न फुटल्याने अनेकांचा जीव वाचला.
