धक्कादायक! मैत्रिणींनेच गुंगीच औषध पाजलं,त्यानंतर बेशुद्ध पीडितेवर मित्राकडून अत्याचार !

बदलापूर: बदलापुरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या पीडितेवर, मैत्रिणीने गुंगीचे औषध पाजून तिला बेशुद्ध केल्यानंतर तिच्या मित्रांनी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी, पाच सप्टेंबर रोजी भूमिका नावाच्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीसाठी पीडिता गेली होती. पार्टी संपल्यानंतर पीडित तरुणी घरी जायला निघाली मात्र तिला चक्कर आली. मळमळ जाणवू लागली. त्यामुळे भूमिका ने तिला आपल्या घरी नेऊन लिंबू सरबत दिलं. पण ते लिंबू सरबतामध्ये गुंगीचा औषध तिने मिसळलं होतं. त्यानंतर तिच्या मित्राने तिला बाथरूम मध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला . त्या तरुणीला अर्धनग्न अवस्थेत सोडून त्या मुलग्याने पळ काढला.

पीडित तरुणी दारू पिऊन बेशुद्ध पडली आहे, असं भूमिका ने तिच्या घरी सांगितले. घरी पोहोचल्यावर वडिलांनी दारू का प्यायली अशी विचारणा करत तिला मारहाण सुरू केली. पीडितीने वडिलांना तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडीतीच्या वडिलांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. वडिलांनी आपल्या मुली सोबत घडलेल्या संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी पीडित्याच्या जिवलग मैत्रिणी सह आरोपीवर ही गुन्हा दाखल केला आहे.