खासदार शरदचंद्र पवार साहेब यांची डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या तळसंदे कॅम्पसला भेट ;

कोल्हापूर : देशाचे माजी कृषिमंत्री आदरणीय खासदार शरदचंद्र पवारसाहेब यांनी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या तळसंदे कॅम्पसला भेट दिली.
तसेच माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील ( दादा) यांची सदिच्छा भेट घेतली.

 

 

 

 

काही वर्षांपूर्वी माळरान असलेल्या या जागेत डॉ.संजय डी.पाटील यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या शैक्षणिक संस्था आणि फार्ममुळे शेतीबद्दल आस्था असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची चांगली सोय झाल्याचे खा. पवार साहेब यांनी नमूद केले.पवार साहेब यांनी ॲग्री फार्ममधील विविध पिके, फळझाडे तसेच डेअरी फार्म यांची माहिती घेतली.

या कॅम्पसमधील डी .वाय पाटील एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीचे खा.पवार साहेब यांच्या हस्ते 1 जुलै 2021 रोजी मुंबईतील कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले होते. आज खा. पवार साहेबांनी या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसला भेट दिली.आमदार ऋतुराज पाटील हे खा. पवार साहेब यांच्यासोबत कोल्हापूरातून कार मधून तळसंदे येथे आले.डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील साहेब यांनी युनिव्हर्सिटीच्या वाटचाली बद्दल माहिती दिली. कुलगुरू डॉ.के. प्रथापन यांनी विविध कोर्सेस आणि उपक्रम याबाबत तर कार्यकारी संचालक डॉ.ए.के.गुप्ता यांनी ग्रुपबाबत सादरीकरण केले.खा.पवारसाहेब यांनी अभ्यासक्रम तसेच शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल समर्पक प्रश्न विचारले.

यावेळी खा.पवारसाहेब यांनी कै. यशवंतराव भाऊराव पाटील स्मृतीस्थळाला भेट दिली.कॅम्पसमधील कृषी विज्ञान केंद्र, बीएससी ऍग्री, बीटेक ऍग्री, टेक्निकल कॅम्पस या संस्थांची सुद्धा पाहणी केली .

यावेळी शांतादेवी डी .पाटील, व्ही .बी पाटील ,ट्रस्टी पृथ्वीराज पाटील,पूजा पाटील, वृषाली पाटील , युनिव्हर्सिटी रजिस्ट्रार डॉ. जे ए.खोत ,फार्म हेड प्रा.अमोल गाताडे तसेच सर्व संस्थांचे प्राचार्य ,शिक्षक शिक्षकेतर स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते.