कोलकाता : प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या झाल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण देशात आंदोलन सुरू झाल. पश्चिम बंगालमधील तरुणाई सुद्धा रस्त्यावर उतरली. यामुळे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार अडचणीत आलं. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत अपराजिता विधेयक सादर केलं विरोधकांनी देखील या विधेयकाला पाठिंबा देऊन त्याला मंजुरी मिळाली.
अपराजिता विधेयकामध्ये बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झालेल्या पीडीतीचा मृत्यू झाल्यास किंवा तिची प्रकृती गंभीर झाल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात येईल. अशी तरतूद करण्यात आली आहे. बलात्कार आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना आजीवन कारावास होईल अशी तरतूद विधेयकात आहे. पश्चिम बंगाल गुन्हे कायद्याने सुधारणा विधेयक 2024 ला अपराजिता महिला आणि बाल विधेयक नाव देण्यात आल आहे.