कोल्हापुरात गर्भवती मातेचा डेंग्यूने मृत्यू: 14 वर्षानंतर लाभणार होतं मातृत्व

कोल्हापूर: कोल्हापुरातील एका 5 महिन्याच्या गरोदर महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाला. ऋतुजा दिनेश गावकर (वय ३७) असं या महिलेचे नाव आहे. यांचे पती दिनेश गावकर रत्नाकर ,बँकेत उच्च पदस्थ अधिकारी आहेत. यांच्या लग्नाला 14 वर्षे झाली होती तरीही त्यांना मुलबाळ नव्हतं. त्यामुळे आयव्हीएफ तंत्रज्ञान उपचाराने त्यांना मातृत्वाचे सुख लाभणार होतं. मात्र डेंगूणे ऋतुजा यांचा त्यांच्या पोटातील दोन बाळासह मृत्यू झाला.

 

 

आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या गरोदर राहिल्या होत्या त्यांच्यासह पोटातील दोन बाळांची ही तब्येत चांगली होती. मात्र आठवड्यापूर्वी त्यांना तीव्र ताप आला होता. सोमवारी त्यांना उपचारासाठी रुग्णालय दाखल केलं होतं. तपासणीमध्ये डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झालं. त्यांच्या प्लेटलेट कमी झाल्या. ऋतुजा यांचा जीव वाचवण्यासाठी गर्भपाताचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर ऋतुजा यांचा (शुक्रवारी दि.30) मृत्यू झाला.