कोल्हापूर: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात चार जागा काँग्रेसला तीन जागा शिवसेना ठाकरे गटाला तर दोन जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला देण्याचा निर्णय झाला आहे.
करवीर मतदार संघात काँग्रेसचे राहुल पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके, कोल्हापूर दक्षिण मध्ये काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार अमल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी शौमिका महाडिक.
शाहुवाडी महायुतीतील जनसुराज्यचे आमदार डॉ. विनय कोरे,विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर व शिरोळ मध्ये शिवसेना शिंदे गटातर्फे आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर व शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील अशा चार लढती निश्चित आहेत.