सेमी हायस्पीड सायझिंग मध्ये न्यू रासाई सायझिंगचा द्वितीय क्रमांक

कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे संचालक बंडोपंत लाड यांचा इचलकरंजी सायझिंग को ऑप सोसायटीच्या वतीने सायझींग धारकांच्या प्रोत्साहनात्मक साठी घेण्यात आलेल्या सेमी हायस्पीड सायझिंग मध्ये न्यू रासाई सायझिंगचा द्वितीय क्रमांक आल्या बद्दल व बँकेचे संचालक रमेश पाटील यांना दैनिक रोखठोक व्हिजन यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे* यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

 

यावेळी बँकेचे व्हा चेअरमन संजयकुमार अनिगोळ, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष सीए चंद्रकांत चौगुले, संचालक बाळकृष्ण पोवळे, बाबुराव पाटील, महेश सातपुते, श्रीशेल कित्तूरे, अविनाश कांबळे, शैलेश गोरे, सी ई ओ संजय शिरगावे, जनरल मॅनेजर दीपक पाटील, किरण पाटील आदि उपस्थित होते.