अमित शहा यांच्या हस्ते होणार कोल्हापूर जिल्हा बँकेचे उद्घाटन !

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. या बँकेमध्ये नोटाबंदीच्या काळात लाखो रुपयांच्या जुना नोटा पडून आहेत. या नोटा बदलून मिळण्याची शक्यता आहे.

 

 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची 86 वी सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की,नोटाबंदीच्या काळातील 25 कोटी 27 लाख रुपयांच्या नोटा या बँकेकडे पडून आहेत.रिझर्व बँकेने या नोटा बदलून द्याव्यात.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला अमित शहा यांना आमंत्रण देण्यात आल आहे.या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांच्यापुढे हा मुद्दा मांडण्यात येणार आहे.असे हसन मुश्रीफ जिल्हा बँकेच्या सभेत बोलताना म्हणाले.