नागपूर: नागपूर येथे रेशीमबाग मैदानावर लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.
यावेळी, “लाडकी बहीण योजनेत जवळजवळ एक कोटी साठ लाख बहिणी लाभार्थी झाले आहेत. ज्यांनी अजूनही अर्ज केलेले नाहीत. त्यांनी अर्ज करावे आम्ही तो लाभ देऊ. विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. मात्र तुम्ही फक्त महायुतीला साथ द्या आम्ही ही योजना कधीही बंद पाडू शकणार नाही.”असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होई,ल यावेळी आम्ही तिघे वेगवेगळ्या चिन्हावर 288 जागावर उभे राहू. त्यावेळी महायुतीला भरपूर मतदान करा. मी शब्द देतो की ही योजना आम्ही पुढील पाच वर्षे सुरू ठेवू तू फक्त आशीर्वाद द्या असे आव्हाने अजित पवार यांनी केलं.