कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी एका भाविकांने स्वत:चे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर शुक्रवारी 71 तोळे 100 ग्रॅम सोन्याचा सुवर्णसिंह अर्पण केला आहे. या सुवर्ण सिंहाची किंमत अंदाजे 50 लाख 33 हजार इतकी आहे.
हा सुवर्णसिंह देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे सुपूर्त केला यावेळी सचिव शिवराज नाईकवाडे मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.