जयसिंगपूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. शिरोळ मध्ये सत्ता संपादन मेळावा घेण्याचा निर्धार

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुका कार्यकारणी च्या वतीने आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची जयसिंगपूर येथे शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शिरोळ तालुका नूतन पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष जिल्हा महासचिव जिल्हा उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांचा सत्कार पुष्पगुच्छ तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन आणि भाषणे जातीव्यवस्थेचे निर्मूलन या पुस्तकाची प्रत देऊन सत्कार घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुक वरिष्ठांच्या आदेशाने मोठ्या ताकतीने लढवण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांनी मार्गदर्शन केले. तसेच शिरोळ तालुक्यामध्ये सत्ता संपादन मेळावा घेण्यासंदर्भात सूचना दिल्या.

 

 

यावेळी जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे यांनी केंद्र सरकारने एससी एसटी आरक्षणाच्या वर्गीकरण संदर्भात तसेच ओबीसी व मराठा आरक्षणासंदर्भात पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष बी आर कांबळे, जिल्हा सचिव अरुण जमणे, हातकणंगले तालुका महासचिव जनार्दन गायकवाड, विद्याधर कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा संघटक करीम खान, महिला आघाडी अध्यक्ष वासंतीताई मेहतर, इचलकरंजी शहराध्यक्ष वैशालीताई कांबळे, तालुका महासचिव गौतम कांबळे, तालुका उपाध्यक्ष छोटू पटेल, तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे, तालुका उपाध्यक्ष दिलीप कांबळे, तालुका संघटक निखिल कांबळे, तालुका संघटक सुनील सुपेकर, तालुका सचिव अजित कांबळे, तालुका सचिव भारत कांबळे, तालुका सह कोषाध्यक्ष आकाश हेगरे,तालुका सल्लागार मच्छिंद्र कांबळे, तालुका सचिव संतोष कांबळे, तालुका सचिव संदीप कांबळे, प्रसिद्धी प्रमुख सुशांत कांबळे, तालुका सचिव भारत कांबळे, तालुका सल्लागार कमरुद्दिन मुल्ला, यासह जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी मधील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545