‘होम मिनिस्टर’ खेळ करमणुकीचा व खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न ;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

ताराराणी पक्ष व महिला आघाडीच्या वतीने जाधव कार्यालय, शहापूर, इचलकरंजी येथे आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचा शुभारंभ  मोश्मी आवाडे  यांच्या हस्ते  जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.

 

 

आपल्या घराला घरपण देताना हा प्रपंचीक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात. माहेर, सासर यातील त्या भक्कम दुवा असतात. त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही तरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून निवेदक विवेक व वीणा यांच्या सोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक फ्रिज निशा बाळण्णावर, द्वितीय क्रमांक ३२” टीव्ही  मेघा कांचनकोटी, तसेच पैठणीचे विजेते दिपाली सुतार, विमल दिंडे, पूजा पाटील, विश्वल पाटील या महिलांना पैठणी असे विजेत्यांनी अनुक्रमे हि बक्षीसे पटकावली. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना लकी ड्रॉ व स्पॉट गेम ५० प्रेशर कुकर मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते सर्व महिला भगिनींना देऊन गौरविण्यात आले.

यावेळी ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, माजी नगरसेविका सुलोचना हेरवाडे, गिरीजा हेरवाडे, मेघा भाटले, शोभा भाट, मेघा माने, सुनीता पाटील, विद्या यलमार, मंगल सोलगे, सविता पुजारी, मयुरी बोरगावे, सुरेखा पाटील, सुजाता घाळी, सुरेखा सुतार, नंदा साळुंखे, संध्या लाटकर, मांजरेकर वहिनी, प्रियंका बमनावर, सरिता डिंगणे, वासंती किणेकर, सपना भिसे, अलका शेलार, अंजुम मुल्ला, अर्चना कुडचे, सीमा कमते, मंगल सुर्वे, शोभा कापसे, दादा भाटले, सचिन हेरवाडे, समीर मुल्ला, अशोक पुजारी, सिद्धेश्वर पाटील, यांच्यासह सोलगे मळा, कारंडे मळा, सावित्री नगर, भोईनगर, शहापूर, जे.के. नगर, आर. के. नगर, रामनगर या भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545