गुरव समाजाच्या प्रलंबित प्रश्नासाठी शासन दरबारी प्रयत्नशील- जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे

 

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

अखिल गुरव समाज संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष.अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष व कागल हातकणंगले फाईव्ह स्टार एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्षहरिश्चंद्र धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुका संपर्क दौरा आयोजित करण्यात आला होता.

 

 

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच गुरव समाजातील नागरिकांना एकत्र करून गुरव समाजाच्या असणाऱ्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अखिल गुरव समाज संघटनेच्या माध्यमातून आपण करणार असून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच विविध व्यवसायासाठी लागणारे सहकार्य करणार असल्याचे मत ही यावेळी जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष स्मिताराणी गुरव यांनी गुरव समाजातील महिलांनी केवळ चुल व मूल करत न बसता आता सामाजिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रात पुढे येणे गरजेचे असून, त्यासाठी अखिल गुरव समाज संघटनेच्या माध्यमातून आपण लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन दिले.

यावेळी गुरव समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून इनाम जमिनीचा प्रश्न आणि केल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी पडून आहे. तसेच अनेक ठिकाणी गुरव समाजावर होत असलेले अन्याय त्यासाठी योग्य तो कायदा करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी गुरव समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील अखिल गुरव समाज संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.त्या निमित्ताने गडहिंग्लज येथील गुरव समाजाबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545